कांदा दरासाठी चांदवडमध्ये उग्र रस्ता रोको; मुंबई-आग्रा महामार्ग ठप्प


चांदवड (नाशिक) — कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी विविध विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी चांदवड येथे आज ‘रस्ता रोको’ आंदोलन केले; मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या आणि सरकारविरोधात निदर्शने केली. प्रमुख मागण्या: प्रति किलो कांदा २४ रुपये हमीभाव, नाफेडकडून थेट बाजार समितीमध्ये खरेदी आणि आधीच्या विक्रीवर प्रती क्विंटल 1,500 रुपयांचे अनुदान.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते अंबादास दानवे, रोहित पवार व हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पोलीस आता प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन कसून नियंत्रण राखले. काही नेत्यांनी पुढील आंदोलनांच्या इशाऱ्याही दिल्या आहेत. पोलिसांनी मार्ग काढण्यासाठी परत चर्चेनंतर सर्वांना सोडले आणि परिस्थिती आटोक्यात आणली आहे.
पत्रकार: विजय रणभोर, पुणे; 9359280220


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!