चाकणमधील सारा कस्तुरी रहिवासी संकुलात पाण्याविना रहिवाशांची फरफट; ऍडमिन पॅनलच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त


चाकणमधील सारा कस्तुरी रहिवासी संकुलात पाण्याविना रहिवाशांची फरफट; ऍडमिन पॅनलच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त

चाकण, ता. २८ मे :चाकण येथील सारा कस्तुरी या रहिवासी संकुलामध्ये पाणीटंचाईसह विविध समस्यांमुळे रहिवासी हैराण झाले असून, ऍडमिन पॅनलच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या कष्टाच्या पैशातून या प्रकल्पामध्ये फ्लॅट खरेदी केले. मात्र, फ्लॅट खरेदीपूर्वी दाखविण्यात आलेल्या अनेक सुविधा व योजना प्रत्यक्षात उपलब्ध नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संकुलात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, नागरिकांना रोजच्या गरजांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेल्या सोसायटी पॅनलकडून दबाव आणला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तसेच, काही रहिवाशांनी आवाज उठवल्यास त्यांना किंवा त्यांच्या भाडेकरूंना फोन करून धमकावले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. ऍडमिन पॅनलमधील काही सदस्य मनमानी पद्धतीने कारभार करत असून, विरोध करणाऱ्यांशी धमकीच्या भाषेत संवाद साधला जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

या सर्व प्रकारामुळे स्वतःचे घर असूनही येथे सुरक्षित आणि समाधानाने राहावे की नाही, असा प्रश्न अनेक रहिवाशांसमोर निर्माण झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधितांविरोधात लवकरच कायदेशीर नोटीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती रहिवाशांकडून देण्यात आली आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणेमो. : ९३५९२८०२२०


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!