निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असून पाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले


निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असून पाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले

भक्ती शक्ती उड्डाणपूल खाली श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण मुंबई पुणे महामार्गावर निगडी ह्या ठिकाणी मेट्रो रेल्वे काम सुरू असून त्या ठिकाणी जे सी बी मशीन ने काम करत असताना पाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले असून त्या मुळे प्रभागातील पाणी पुरवठा बंद झाला होता त्या मुळे प्रभागातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागला निगडी गावठाण यमुना नगर साईनाथ नगर लक्ष्मी नगर ह्या भागातील पाणी पुरवठा बंद करण्यात आल्या मुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागला त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठेकेदार ह्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून हजारो लिटर पाणी वाया गेले तसेच नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याने ठेकेदार ह्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या अनेक वेळा पाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांनी मेट्रो रेल्वे ठेकेदार ह्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी
सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पिंपरी चिंचवड शहर यांनी केली आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!