Yerawada Central Jail मध्ये कैद्यांमध्ये राडा; तंबाखूच्या कारणावरून दोन गट भिडले

पुणे : पुण्यातील Yerawada Central Jail येथे कैद्यांच्या दोन गटांमध्ये तंबाखू खाण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कारागृह परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कैदी शुभम पोखरकर याला अजय राठोड आणि संतोष भालेराव यांनी मारहाण केली. वादाचे कारण तंबाखू खाण्यावरून झालेला किरकोळ वाद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा वाद पुढे वाढत जाऊन दोन्ही गट आमनेसामने आले.
या हाणामारीत शुभम पोखरकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी Yerawada Police Station येथे अजय राठोड आणि संतोष भालेराव यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. कारागृहात कैद्यांमध्ये वाढत्या वादांच्या घटनांमुळे प्रशासनासमोर सुरक्षा राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!