तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई; पुणे, संभाजीनगर व धाराशिव येथे भेसळयुक्त आंबे, तूप आणि खवा जप्त.


तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई; पुणे, संभाजीनगर व धाराशिव येथे भेसळयुक्त आंबे, तूप आणि खवा जप्त

पुणे प्रतिनिधी: राज्यात अन्नसुरक्षेबाबत मोठी कारवाई करत प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पथकाने पुणे, संभाजीनगर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये धडक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त आंबे, तूप आणि खवा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विविध ठिकाणी अचानक छापे टाकून संशयित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले. प्राथमिक तपासणीत काही पदार्थांमध्ये रासायनिक भेसळ तसेच निकृष्ट दर्जाचे घटक आढळून आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर संबंधित माल तात्काळ जप्त करण्यात आला.

या कारवाईमुळे तीनही जिल्ह्यांतील भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून जप्त केलेले नमुने पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना दर्जेदार आणि अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, तसेच संशयास्पद पदार्थ आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!