पुण्याच्या जेजुरी टोल नाक्यावर रील स्टार महेश मोटेची भाईगिरी; व्हिडिओ व्हायरल


पुण्याच्या जेजुरी टोल नाक्यावर रील स्टार महेश मोटेची भाईगिरी; व्हिडिओ व्हायरल


जेजुरी :पुणे-पंढरपूर महामार्गावरील जेजुरी टोल नाक्यावर रात्रीच्या वेळी मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला रील स्टार महेश मोटे याने टोल कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत दादागिरी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

माहितीनुसार, टोल नाक्यावर वाहन अडवण्यात आल्याने संतप्त झालेल्या महेश मोटे याने कर्मचाऱ्यांशी अरेरावी केली. “मी सर्वसामान्य नागरिक नाही, रील स्टार आहे. माझी गाडी कशी अडवली?” असा सवाल करत त्याने टोल कर्मचाऱ्यांना जाब विचारला.
यानंतर त्याने आपली गाडी रस्त्यात आडवी उभी करून वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे काही काळ टोल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
“रील बनवणार नाही” अशी धमकी
वाद वाढत असताना महेश मोटे याने “गाडी सोडली नाही तर उद्यापासून रील बनवणार नाही,” अशी विचित्र धमकी दिल्याचाही दावा करण्यात येत आहे. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी त्याच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत पोलिस तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

पत्रकार : उमेश कुलकर्णी
मोबाईल : 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!