तासगावात गांजा विक्रीचा डाव उधळला; दीड किलो गांजासह युवक जेरबद 


तासगावात गांजा विक्रीचा डाव उधळला; दीड किलो गांजासह युवक जेरबद

जि.सांगली:ता.तासगाव दि. 30 मे :- तासगाव येथील कापूर ओढा परिसरात गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या रोहित राजू जाधव (वय २४, रा. सिद्धेश्वर कॉलनी, तासगाव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सुमारे दीड किलो गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली.

गस्ती दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी पथकासह कारवाई केली. कापूर ओढा परिसरातील स्मशानभूमीजवळ संशयित हालचाली करताना रोहित जाधव आढळून आला. झडतीत त्याच्याकडे ४५ हजार रुपये किमतीचा गांजा सापडला.

चौकशीत जास्त दराने विक्रीसाठी गांजा आणल्याची कबुली त्याने दिली. ही कारवाई निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!