५० लाखांसाठी महिला पोलीस अंमलदाराचा छळ; पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा


५० लाखांसाठी महिला पोलीस अंमलदाराचा छळ; पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर : प्रेमविवाहानंतर ५० लाख रुपयांची मागणी करत ३१ वर्षीय महिला पोलीस अंमलदाराचा पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात पती दीपक जाधव याच्यासह सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला पोलीस अंमलदाराने प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पती व सासरच्या मंडळींकडून ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. मागणी पूर्ण न केल्याने तिचा मानसिक तसेच शारीरिक छळ करण्यात आल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.
विशेष म्हणजे, महिला गरोदर असतानाही तिला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच नोकरी सोडण्यासाठी दबाव आणण्यात आला. मागण्या मान्य न केल्यास मुलांना इजा करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने स्वतःच्या संरक्षणासाठी ठाणे येथून छत्रपती संभाजीनगर येथे बदली करून घेतली. मात्र, बदलीनंतरही त्रास सुरूच राहिल्याने अखेर तिने छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे छावणी पोलिसांनी पती दीपक जाधव, सासू आणि सासऱ्यांविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!