फसव्या जाहिरातींना लगाम; सेलिब्रिटींसह ब्रँड ॲम्बेसेडरवरही होणार कारवाई – FDA आयुक्त तुकाराम मुंढे मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA)


फसव्या जाहिरातींना लगाम; सेलिब्रिटींसह ब्रँड ॲम्बेसेडरवरही होणार कारवाई – FDA आयुक्त तुकाराम मुंढे

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गुटखा आणि भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्या २८ दुकानांवर कारवाई केल्यानंतर आता त्यांनी ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींवर लक्ष केंद्रित केले आहे.
मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणारे उत्पादक, जाहिरातदार तसेच त्या जाहिरातींमध्ये सहभागी असलेले ब्रँड ॲम्बेसेडर आणि सेलिब्रिटी यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणालाही कायद्यापासून सूट दिली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ग्राहकांच्या आरोग्याशी आणि आर्थिक हिताशी संबंधित बाबींमध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी FDA अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे विविध उत्पादनांच्या प्रचारासाठी सेलिब्रिटींचा वापर करणाऱ्या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ग्राहक संरक्षण आणि अन्नसुरक्षेला प्राधान्य देत भेसळ, बनावट दावे आणि फसव्या जाहिरातींविरोधातील मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत FDA प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
– उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!