जुनं सोनं चोरीला”; कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल:-


जुनं सोनं चोरीला”; कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल:-

जि. छ. संभाजीनगर:ता. कन्नड:दि. 11 जून :-मिळालेल्या माहितीनुसार, दि. 8 आणि 9 जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कन्नड तालुक्यातील रेल गावातील उज्वला गणेश नागे आणि पद्माकर दामोधर बोडखे यांच्या राहत्या घराचे दरवाजे उघडून अलमारी तोडली आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे 8 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, तितक्याच वजनाच्या बाळ्या, सहा भार चांदीचे दागिने तसेच सहा भार दंडकडे यांचा समावेश आहे. तसेच उज्वला गणेश नागे यांच्या घरातून सोन्याचा हारही चोरीस गेला आहे. हे दागिने 10 ते 12 वर्ष जुने असल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!