शेतकरी प्रश्नांसाठी संघर्षाची नवी जबाबदारी; महेंद्र बेराड यांची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या भोकरदन तालुका प्रमुखपदी नियुक्ती


शेतकरी प्रश्नांसाठी संघर्षाची नवी जबाबदारी; महेंद्र बेराड यांची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या भोकरदन तालुका प्रमुखपदी नियुक्ती

पारध, ता. भोकरदन प्रतिनिधी : शेतकरी, शेतमजूर, तरुण तसेच सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार महेंद्र बेराड यांची क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या भोकरदन तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. रविकांतजी तुपकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते ही नियुक्ती करण्यात आली.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री. राजीवजी कसबे साहेब, प्रदेश समन्वयक मा. सचिनजी पांडुळे साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष श्री. सुरेशजी गवळी साहेब तसेच जालना जिल्हाध्यक्ष/जिल्हाप्रमुख श्री. विष्णू रंगनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी विविध स्तरांवर संघर्ष सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. आप्पासाहेब ओंकरराव कदम यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर श्री. विष्णू रंगनाथ शिंदे यांची जालना जिल्हाध्यक्ष/जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर महेंद्र बेराड यांची भोकरदन तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शेतकरी प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचा संकल्प

महेंद्र बेराड हे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत आले आहेत. रस्ते, एस.टी. बससेवा, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण, कृषीविषयक समस्या तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सोपविलेली ही जबाबदारी शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरून शेतकऱ्यांना न्याय, हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी तालुक्यात व्यापक पातळीवर काम करण्याचा निर्धार महेंद्र बेराड यांनी व्यक्त केला आहे.

भोकरदन तालुक्यातील शेतकरी व तरुणांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देणे, शासनाच्या विविध योजना व शेतकऱ्यांचे अधिकार याबाबत जनजागृती करणे तसेच अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने संघर्ष उभारणे, या दिशेने काम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

“शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडविणे, त्यांना न्याय व सन्मान मिळवून देणे आणि शेतकरी चळवळ अधिक मजबूत करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील. संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून भोकरदन तालुक्यातील प्रत्येक शेतकरी व सर्वसामान्य नागरिकाच्या प्रश्नासाठी संघर्ष करणार,” अशी प्रतिक्रिया महेंद्र बेराड यांनी दिली.

महेंद्र बेराड यांच्या नियुक्तीबद्दल पारध परिसरासह भोकरदन तालुक्यातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, तरुण व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील शेतकरी प्रश्नांना अधिक व्यापक आणि आक्रमक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!