फिरोजाबाद येथे शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक; मोहन भागवत सुरक्षित.


फिरोजाबाद येथे शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक; मोहन भागवत सुरक्षित.

Oplus_16908288

प्रतिनिधी: उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे गुरुवारी (११ जून) संध्याकाळी एक खळबळजनक घटना घडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक Mohan Bhagwat प्रवास करत असलेल्या लखनौ-दिल्ली शताब्दी एक्सप्रेसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या घटनेत दगड E-1 कोचच्या खिडकीवर आदळल्याने काच फुटली. मात्र, मोहन भागवत हे त्या वेळी सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास फिरोजाबाद रेल्वे स्थानकाजवळील पेमेश्वर गेट पुल परिसरात ही घटना घडली. भागवत हे कानपूरहून E-1 कोचमध्ये प्रवास करत होते. दगडफेकीनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, दगडफेक करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकारामुळे रेल्वे सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, संघाच्या सूत्रांनी मोहन भागवत पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली असून रेल्वेने पुढील प्रवास सुरळीत सुरू ठेवला.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!