पीसीएमसीच्या सर्वसाधारण सभेचे लाईव्ह बंद; १५ दिवसांत निर्णय मागे घ्या, अन्यथा पीआयएल


पीसीएमसीच्या सर्वसाधारण सभेचे लाईव्ह बंद; १५ दिवसांत निर्णय मागे घ्या, अन्यथा पीआयएल

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सोमवार पासून होणाऱ्या सर्व साधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण प्रतिबंध केला असून हे बेकायदेशीर आहे. पुढील १५ दिवसात पूर्वीप्रमाणे सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू करावे, अन्यथा नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करून दाद मागू असा इशारा ॲड. असीम सरोदे यांनी दिला. सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे उपस्थित होते.
ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले की, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सभांचे लाईव्ह प्रक्षेपण सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करणे आणि ते शासनाच्या वेबसाईटवर सात दिवसात प्रसिद्ध करणे हे आवश्यक आहे. याबाबत आम्ही यापूर्वीच शासनाकडे पत्रव्यवहार केला असून नगरपरिषद प्रशासन संचालनालय आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून महानगरपालिकेतील प्रशासन आणि नगरसेवक यांचा भ्रष्टाचार सामान्य जनतेपुढे येऊ नये. यासाठी मनमानी पद्धतीने प्रक्षेपण बंद करीत आहेत. लोकशाही मध्ये पारदर्शकता महत्वाची आहे. सभागृहात चालणारे कामकाज सर्व सभासद आणि मतदारांना जाणून घेण्याचा अधिकार आहे असेही ॲड सरोदे यांनी सांगितले.
प्रतिनिधी विजय अडसूळ


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!