C, M, Y, K प्रेसमध्ये सायबर वॉरियर्स कडून सायबर सुरक्षा जनजागृती अभियान
जळगाव : सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे आणि डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत, या उद्देशाने जळगाव एमआयडीसी परिसरातील C, M, Y, K प्रेसमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानादरम्यान सायबर वॉरियर्स विद्या सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी कंपनीतील कर्मचारी व स्टाफला सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. फेक कॉल, संशयास्पद मेसेज, बनावट लिंक, खोट्या वेबसाइट्स तसेच बनावट अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीच्या विविध प्रकारांची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी OTP, पासवर्ड, बँकिंग माहिती किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये Quick Heal फौंडेशन चे Anti-Fraud App डाउनलोड करून देण्यात आले. या अॅपचा वापर आणि त्याच्या माध्यमातून सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याच्या उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी फील्ड प्रोजेक्ट Volunteer सतेंद्र सौदाने उपस्थित होते. आर. बी. आमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर वॉरियर्स च्या माध्यमातून C, M, Y, K प्रेसमधील कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.
डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने डिजिटल सुरक्षेबाबत सजग राहणे आणि कोणताही ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429




