कोपरगाव पोस्ट ऑफिसमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न:-


कोपरगाव पोस्ट ऑफिसमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न:-

जि.अहिल्यनगर,ता.कोपरगाव:दि. 16 जून :-जागतिक रक्तदान दिनानिमित्त कोपरगाव पोस्ट ऑफिस व गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव पोस्ट ऑफिस, धारणगाव रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “तुमच्या रक्ताचा एक थेंब, एखाद्याचे जीवन वाचवू शकतो” या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला अधिकारी, कर्मचारी, ग्राहक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

श्रीरामपूर विभागाचे डाक अधीक्षक उमेश जनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन डाक निरीक्षक संतोष केंद्रे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमास गोकुळधाम गोरक्षा केंद्राचे पदाधिकारी अमित लोहाडे तसेच कोपरगाव पोस्ट ऑफिसचे सब पोस्टमास्तर रवींद्र परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या रक्तदान शिबिरात पोस्ट विभागातील अधिकारी, कर्मचारी, GDS बांधव, त्यांचे कुटुंबीय, पोस्ट विभागाचे ग्राहक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे महिला कर्मचारी कु. तन्वी कवडे व कुमारी सविज्ञा पिवळ, जेऊर कुंभारी यांनीही रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. त्यांच्या या सहभागाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

रक्तदान शिबिरात संजय उदावंत नगरसेवक, अतुल काले नगरसेवक, वाल्मिकी लाहिरे नगरसेवक, जितेंद्र कासलीवाल, आनंद पहाडे, डॉ. जगदाळे, संतोष गंगवाल, सुधीर डागा , राजेंद्र शिरोडे , शैलेश ठोळे , प्रवीण पाटणी, विनायक गायकवाड, विनीत वाडेकर, भाऊसाहेब भाबड, कैलास हाडोळे, सुमित भोंगळे, आदेश जाधव, मच्छिंद्र आव्हाड, आकाश गाडेकर, बाळासाहेब कोताडे, प्रसाद वसमतकर, गौरव बोडखे, नितीन वाघमारे, संजय माळी, योगेश शेजवळ, मोहन जाधव, गणेश रणधीर, प्रमोद शिनगारे, संभाजी गोधडे, तन्वी कवडे, प्रशांत शिंदे, गौरव गाडे,, विजय गुंजाळ, गौरव वाघ, राजेश नेतनकर सुदाम कोरके, मेजर संदीप घेगडमल, पुजाहरी जाधव रवि शिंदे, वरुण पाटील, निखिल कदम, आकाश आढाव, सविज्ञा पिवळ, संदीप जोर्वेकर, नंदू जोर्वेकर माऊली गिते नंदू लाडगे, निकिता आंबेडकर,सारिका दहिफळे, श्रद्धा आडगावकर, प्रियांका वीर व संदीप काशिनाथ घाडगे यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बाभूळके यांनी केले तर ट्रेझरर विजय जोर्वेकर यांनी उपस्थितांचे व रक्तदात्यांचे आभार मानले.

सामाजिक उत्तरदायित्व जपत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते, आयोजक आणि सहकाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!