रामनगर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत:-
जि. वर्धा :दि.16 जून :-मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्याचे दारूबंदी पथक रात्री गस्त घालत असताना त्यांना एका चारचाकी वाहनातून अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुनापाणी चौक पुलाच्या सर्व्हिस रोडवर सापळा रचून नाकाबंदी केली.
पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान संशयित वाहन अडवून झडती घेतली असता, वाहनात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू व बिअरचा साठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :
‘टॅंगो पंच’ देशी दारू ९० ML च्या २०० शिश्या – किंमत ₹२०,०००
ट्यूबर्ग बिअर ६५० ML च्या १२ बाटल्या – किंमत ₹५,४००
ट्यूबर्ग बिअर कॅन ५०० ML चे ७२ डबे – किंमत ₹२८,८००
बडवायझर बिअर ६५० ML च्या १२ बाटल्या – किंमत ₹५,४००
निळ्या रंगाची मारुती सुझुकी कार (MH 40 KR 4360) – किंमत ₹६,००,०००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹६,५९,६००
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे मॅडम व सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले यांच्या नेतृत्वाखाली दारूबंदी पथकातील अवि. बनसोड, मनोज भोमले, मुकेश वांदिले आणि विकी अणेराव यांनी ही धडक कारवाई पार पाडली.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.





