युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पिंपरी-चिंचवड : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड येथे वक्तृत्व स्पर्धा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिवसैनिक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय विषयांवर प्रभावीपणे आपली मते मांडली. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शिवसेना शहर प्रमुख चेतन पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत सामाजिक जाणीव जोपासण्याचे आवाहन केले. युवकांनी आपल्या कौशल्यांचा विकास करून समाज व राष्ट्र उभारणीत सक्रिय योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास अशोक वाळके, कैलास नेवासकर, दिलीप सावंत, सर्व विभाग प्रमुख, शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या सहकार्याने करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम भविष्यातही राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
पत्रकार विजय अडसूळ






