पुणे–शिर्डी रेल्वे प्रवासाला नवी गती; १७ जूनपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस सुरू.


पुणे–शिर्डी रेल्वे प्रवासाला नवी गती; १७ जूनपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस सुरू.

पुणे : पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून, १७ जून २०२६ पासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही थेट रेल्वे सेवा सुरू होत आहे. या नव्या रेल्वे सेवेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात येणार आहे. तसेच अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
ही रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी खासदार लंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डीदरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
या थेट रेल्वे सेवेचा लाभ विशेषतः साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक, विद्यार्थी, व्यापारी तसेच दैनंदिन प्रवासी यांना होणार आहे. यामुळे प्रवासातील गैरसोय कमी होऊन वाहतुकीचा एक जलद आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होणार आहे.
तसेच या रेल्वे संपर्कामुळे शिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक व्यापार, उद्योग आणि अर्थव्यवस्थेलाही मोठे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे. पुणे–शिर्डी दरम्यानची ही नवीन रेल्वे सेवा परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!