कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाला वणीतील युवक-विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा:-


कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाला वणीतील युवक-विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा:-

जि.यवतमाळ, ता.वणी:दि. 22 जून :-दिल्ली येथील जंतरमंतरवर अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कॅकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वणी येथे युवक व विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केले. वणीतील नामांकित युवाशक्ती संघटनेच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.

स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, वाढती बेरोजगारी तसेच शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

टिळक चौक, वणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात संभाजी बिग्रेड, AISF संघटना तसेच विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

युवकांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी वाचनालयातील परीक्षार्थी, विद्यार्थी आणि पालकांनीही आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी उपस्थितांनी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेच्या वतीने वणी तालुक्यात भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!