तामकणे गावात बिबट्याची दहशत; पाळीव कुत्र्याची शिकार :-


तामकणे गावात बिबट्याची दहशत; पाळीव कुत्र्याची शिकार :-

जि. सातारा, ता.पाटण:दि. 22 जून :-पाटण तालुक्यातील तामकणे गावात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 21 जून 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गावातील आनंदा बंडू शिंदे यांच्या घराजवळ बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्या कुत्र्याला घेऊन पसार झाल्याची घटना घडली.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून, ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. गावातील अनेक शेतकरी व नागरिकांची जनावरे घराबाहेर बांधलेली असतात. त्यामुळे जनावरांवरही हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच पाटण तालुका वन विभाग अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पत्रकार:विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!