टाकळीभान येथे आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन साजरा.


टाकळीभान येथे आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन साजरा

टाकळीभान प्रतिनिधी – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील माजी खासदार गोविंदराव आदिक यांच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन साजरा करण्यात आला.

यावेळी ग्राम विकास अधिकारी दादासाहेब भिंगारदे अंगणवाडी सुपरवायझर आशाताई खेडकर टाकळीमान एकल महिला संघटनेचे अध्यक्ष मंगल ताई जाधव ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव लोखंडे यांच्या हस्ते स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अर्चनाताई रणनवरे होत्या,

यावेळी ग्रामविकास अधिकारी भिंगारदे यांनी स्त्री शक्ती सबलीकरण शासनाने एकल महिला बचत गटाच्या माध्यमातून एक रुपयात शेती भेटणार भेटणार आहे, महिलांना लघुउद्योगाकडे शासनाने प्राधान्य दिले आहे,घरकुलासाठी जागा ही शासन उपलब्ध करून देणार आहे,शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सविस्तर माहिती दिली, एकल महिलांनी कोणतेही शासकीय कामकाज असेल तर त्यांनी निसंकोच पणे ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामसेवक भिंगारदे यांनी केली आहे.

यावेळी आशाताई खेडकर यांनी शासनाच्या एका महिलांच्या मुला मुलींना बाल संगोपनाचे फॉर्म भरून आर्थिक लाभ घ्यावा एकलडोल चे फॉर्म भरून घ्यावे ज्याचे डोल बंद पडले असेल अशा महिलांनी नावे आमच्याकडे द्यावे आम्ही हे सर्व माहिती शासनाकडे पाठवणार आहे, याविषयी मार्गदर्शन केले

याप्रसंगी मीरा गवंदे, सोनल आसणे, अरुणा पाबळे, शिल्पा जाधव, अलका सिद्धेश्वर, कचराबाई गायकवाड, मिराबाई गायकवाड ,तुळसाबाई कांबळे, अनिता लोखंडे, जोशी मॅडम, सावित्राबाई चांडे, सुनिता शिरसाठ, छाया लांडगे, कोकणी मॅडम, तिलातमा शिंदे, विमल गांगुर्डे, लहानबाई निकम, सुमन बनकर, स्वाती रणवरे सीताबाई दुशिंग, सुमनबाई गांगुर्डे, ज्योती अमोलिक, मनीषा शिंगारे, जनाबाई दाभाडे, मालती खिलारे, लताबाई गांगुर्डे,महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोशी मॅडम यांनी केले,

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!