टाकळीभान येथे नूतन व आदिनाथ झुरळे यांचा सत्कार


टाकळीभान येथे नूतन व आदिनाथ झुरळे यांचा सत्कार

 

टाकळीभान प्रतिनिधी-अशोक सहकारी साखर कारखानाच्या व्हॉईस चेअरमन पदी आदिनाथ झुरळे , यांचे निवड झाल्याबद्दल टाकळीभान येथे पवार कुटुंब यांच्या वतीने भव्य नागरिक सरकार करण्यात आला,

यावेळी सत्काराला उत्तर देताना झुरळे म्हणाले आपला कारखाना चालवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे ,बाहेरच्या कारखान्याला ऊस दिला नाही पाहिजे ,आपला कारखाना आपली कामधेनुआहे, टाकळीभानकरांनी माझा सत्कार केला, त्यांचे मी ऋणी आहे, व सभासदांना न्याय देईल,

या निमित्ताने उत्तमराव पवार यांच्या घरी स्नेह भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला होता,

यावेळी अशोक कारखान्याचे कारेगाव विभागाचे संचालक शिवाजी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पटारे, प्रगतशील शेतकरी उत्तम पवार, मयुर पटारे , संत सावता सोसायटीचे संचालक विलास दाभाडे, एकनाथ पटारे गोरख पटारे, अशोक पवार, लहानभाऊ पवार, संपत कांबळे, मच्छिंद्र पटारे, गुरु गटकळ, सुनील बोडखे, यावेळी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!