लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर सरकारचा बडगा; अपात्र लाभार्थी व पुरुषांकडून १६५ कोटींच्या वसुलीचे आदेश


लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर सरकारचा बडगा; अपात्र लाभार्थी व पुरुषांकडून १६५ कोटींच्या वसुलीचे आदेश

मुंबई:
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांविरोधात सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. अपात्र लाभार्थी, शासकीय महिला कर्मचारी आणि चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून मिळालेली रक्कम वसूल करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानमंडळात दिलेल्या माहितीनुसार, योजनेचा गैरफायदा घेतलेल्या १३,४१५ शासकीय महिला कर्मचाऱ्यांसह इतर अपात्र लाभार्थ्यांकडून सुमारे १६५ कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. तसेच अशा लाभार्थ्यांचे पुढील हप्तेही तात्काळ बंद करण्यात आले आहेत.
याशिवाय, भविष्यात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लाभार्थ्यांसाठी e-KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून पात्रतेची पडताळणी अधिक कडक करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, फसवणूक करून किंवा नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतलेल्या व्यक्तींवरच वसुलीची कारवाई केली जाणार असून, पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पूर्ववत सुरू राहणार आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी

9822548429


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!