३० जून पासून मतदार पडताळणी, भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण;


३० जून पासून मतदार पडताळणी, भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण;
भोसरी विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या तयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि नवनियुक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणात भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कालबद्ध कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. प्रगणना पत्रक भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच घरभेटी दरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या ६ लाख ३६ हजार ४२४ मतदार असून मतदार यादीतील मॅपिंगचे प्रमाण ५८.६६ टक्के आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी ४८३ बीएलओ आणि ४८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ घरभेटी देऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. या वेळी प्रगणना पत्रके भरून घेण्यात येणार असून मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!