पनवेल येथील अंगणवाडीत लहान मुलीवर अत्याचार; दोषींवर कठोर कारवाईसाठी मनसे आक्रमक


पनवेल येथील अंगणवाडीत लहान मुलीवर अत्याचार; दोषींवर कठोर कारवाईसाठी मनसे आक्रमक

​पनवेल: पनवेल जवळील नांदगाव येथील अंगणवाडीत एका लहान मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे वृत्त सोशल मीडियावर समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर तातडीने आणि अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओच्या माहितीनुसार, या गंभीर प्रकरणाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पनवेल तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. पीडित चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने प्रशासनाला ‘मागणी करण्यात आली आहे.
​अंगणवाडी सारख्या सुरक्षित आणि विश्वासाच्या ठिकाणी लहान मुलींसोबत अशा निंदनीय घटना घडत असल्यामुळे पालकांमध्ये कमालीची भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील मुख्य दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
​या संवेदनशील प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका आणि सविस्तर तपास अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!