नागपूरमध्ये तरुणाच्या मेंदूतील रक्तवाहिनी फुटली, पक्षाघाताचा झटका
नागपूर: शरीरसौष्ठवाच्या नादात क्षमतेपेक्षा अधिक व्यायाम करणे एका तरुणाला महागात पडले आहे. नागपूरमध्ये अतितीव्र व्यायामानंतर एका तरुणाच्या मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, त्याला पक्षाघाताचा झटका आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यायामादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने संबंधित तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्याचे निदान झाले. या घटनेनंतर त्याच्यावर उपचार सुरू असून त्याला पक्षाघाताचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलणे, अति श्रम करणे किंवा आधीपासून असलेल्या वैद्यकीय समस्यांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणताही व्यायाम प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








