टीईटी पेपरफुटी प्रकरण: २८ जूनची परीक्षा पुढे ढकलली; राज्य सरकारचा मोठा निर्णय


टीईटी पेपरफुटी प्रकरण: २८ जूनची परीक्षा पुढे ढकलली; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षात  (TET) पेपरफुटीच्या संशयित प्रकरणानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत २८ जून २०२६ रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

भिवंडी परिसरात पोलिसांच्या कारवाईदरम्यान टीईटीच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता कायम राखण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पेपरफुटीमागील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. परीक्षेची नवीन तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरातील हजारो परीक्षार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

पत्रकार सिंथिया कोरिया


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!