पिंपरी-चिंचवड शहर उपशहर प्रमुखपदी मिथुन गजरे यांची नियुक्ती; कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश


पिंपरी-चिंचवड शहर उपशहर प्रमुखपदी मिथुन गजरे यांची नियुक्ती; कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

पिंपरी-चिंचवड : भोसरी विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे विभागप्रमुख असलेले मिथुन गजरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्थानिक नेत्या सुलभा उबाळे यांनी हा पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला.
यावेळी पक्षाकडून मिथुन गजरे यांची पिंपरी-चिंचवड शहर उपशहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांच्यावर भोसरी विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मिथुन गजरे यांच्यासोबत संदीप उदगीरे, प्रदीप देशमुख, गणेश मानकर आणि नितीन घुले यांनीही शिवसेनेत प्रवेश करून भगवा हाती घेतला. या प्रवेशामुळे भोसरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पत्रकार विजय अडसूळ


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!