उत्तर पश्चिम जिल्हा मुंबईत पेपर फुटी प्रकरणाविरोधात जन आंदोलन; राहुल गांधींच्या ‘कोटा’ येथील भाषणाचा प्रचार


उत्तर पश्चिम जिल्हा मुंबईत पेपर फुटी प्रकरणाविरोधात जन आंदोलन; राहुल गांधींच्या ‘कोटा’ येथील भाषणाचा प्रचार

​मुंबई:देशभरात गाजत असलेल्या पेपर फुटी प्रकरणाविरोधात जननायक आणि विरोधी पक्षनेते आदरणीय श्री. राहुल गांधीजी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात जन आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून, उत्तर पश्चिम जिल्हा मुंबईच्या अध्यक्षा मा. भावना जैन मॅडम यांच्या नेतृत्वात उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये राहुल गांधीजींच्या ‘कोटा’ येथील भाषणाचा जोरदार प्रचार व प्रसार केला जात आहे.
​विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या गंभीर मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी स्थानिक महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबवली जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना समस्येचे गांभीर्य समजावून सांगणे, त्यांच्याशी थेट चर्चा करणे आणि माहिती पत्रकांचे (पॅम्पलेट्स) वाटप करणे अशा स्वरूपात हा कार्यक्रम राबवण्यात आला.
​प्रमुख महाविद्यालयांमध्ये जनजागृती
​आज या मोहिमेतंर्गत उत्तर पश्चिम जिल्ह्यातील खालील प्रमुख महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम पार पडले:
​तोनाली कॉलेज – अंधेरी पूर्व
​इस्माईल युसुफ कॉलेज – जोगेश्वरी पूर्व
​चिनॉय कॉलेज – अंधेरी पूर्व
​विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या आंदोलनाला आणि जनजागृती मोहिमेला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. आपल्या हक्कांसाठी आणि न्याय्य व्यवस्थेसाठी विद्यार्थ्यांनी या चर्चेत हिरीरीने भाग घेतला, ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

पत्रकार सिंथिया कोरिया मुंबई


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!