मुंबई: चेंबूरमध्ये झाड कोसळून मोठी दुर्घटना, एका महिलेचा मृत्यूझाल्याची भीती; बचावकार्य सुरू
चेंबूर पूर्व येथील ११व्या रोडवरील सेंट अँथनी स्कूलजवळ काही वेळापूर्वी एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका उभ्या असलेल्या शालेय बसवर अचानक मोठे झाड कोसळले.
या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. संबंधित महिला झाड आणि बसच्या मध्ये गंभीररीत्या अडकली असून, तिला बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून मदतकार्य वेगाने सुरू आहे. या घटनेबाबत प्रशासकीय पातळीवरून अधिकृत माहिती येणे अजून बाकी आहे.
पत्रकार सिंथिया कोरिया मुंबई
Views: 87









