नेरूळमध्ये शॉर्टसर्किटमुळे पाण्यात उतरला विद्युतप्रवाह; विजेचा धक्का लागून दोन कॉलेज तरुणी गंभीर जखमी
नवी मुंबई : नेरूळ येथील एल.पी. ब्रिजखालील बिकानेर स्वीट्ससमोर मुसळधार पावसादरम्यान धक्कादायक घटना घडली. एका विद्युत वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उच्चदाबाचा विद्युतप्रवाह पसरल्याची घटना घडली.
या पाण्यातून जात असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने दोन महाविद्यालयीन तरुणी गंभीर जखमी होऊन पाण्यात कोसळल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने दोघींना रिक्षाच्या मदतीने डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पावसाळ्यात विद्युत सुरक्षेबाबत प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित यंत्रणेकडून या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






