मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार पाऊस; IMD कडून रेड अलर्ट जारी
मुंबई : महाराष्ट्रात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429
Views: 81






