कॅफेमध्ये कथित गैरवर्तन; डेक्कन पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप कदम निलंबित
पुणे : पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम यांना कॅफेमध्ये कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
६ जून रोजी रात्रपाळीवर असताना कदम यांनी शिरोळे रोडवरील ‘फ्लाइंग जिप्सी’ कॅफेमध्ये प्रवेश करून हातातील काठीने काउंटरवरील साहित्य पाडल्याचा तसेच ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावीची वर्तणूक केल्याचा आरोप आहे.
हा संपूर्ण प्रकार कॅफेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात आल्यानंतर पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत उपनिरीक्षक संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822518429






