‘IMA उत्कृष्ट कार्डिओलॉजिस्ट पुरस्कार’ाने डॉ. विष्णु हरिभाऊ भुते यांचा गौरव; बारी समाजाचा अभिमान


‘IMA उत्कृष्ट कार्डिओलॉजिस्ट पुरस्कार’ाने डॉ. विष्णु हरिभाऊ भुते यांचा गौरव; बारी समाजाचा अभिमान

भोकरदन (प्रतिनिधी महेंद्र बेराड) दि.२ जुलै : मूळचे अवघडराव सावंगी (ता. भोकरदन, जि. जालना) येथील शेतकरी हरिभाऊ कचरू भुते यांचे सुपुत्र तथा जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विष्णु हरिभाऊ भुते यांना त्यांच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसाठी ‘IMA उत्कृष्ट कार्डिओलॉजिस्ट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दैनिक दिव्य मराठी आयोजित गौरव सन्मान सोहळ्यात १ जुलै २०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. भुते यांनी वैद्यकीय क्षेत्रात ज्ञान, कौशल्य, सेवाभाव आणि माणुसकी यांचा सुंदर संगम साधत हजारो हृदयविकारग्रस्त रुग्णांना उत्कृष्ट उपचार देऊन नवजीवन दिले आहे. रुग्णांप्रती आत्मीयता, आधुनिक उपचारपद्धती आणि प्रामाणिक सेवेमुळे त्यांनी जालना जिल्ह्यात विश्वासार्ह हृदयरोगतज्ज्ञ म्हणून मानाचे स्थान मिळवले आहे.

या पुरस्कारामुळे केवळ डॉ. भुते यांचाच नव्हे, तर जालना जिल्हा आणि संपूर्ण बारी समाजाचा गौरव वाढला असल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली. त्यांच्या यशामुळे समाजातील युवकांना वैद्यकीय व इतर क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

डॉ. भुते यांच्या या यशाबद्दल अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्रजी घोलप, उपाध्यक्ष तुळशीरामजी पायघन, हिरालाल सेठ कोथलकर, जालना जिल्हाध्यक्ष बाळूशेठ कोथलकर, जिल्हा उपाध्यक्ष दादाराव राऊत, देविदास बेराड, जालना शहराध्यक्ष समाधान तेलंग्रे, भोकरदन तालुकाध्यक्ष सुभाष राऊत, तालुका उपाध्यक्ष महेंद्र बेराड सर तसेच महासंघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, समाजबांधव व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. विष्णु हरिभाऊ भुते यांना प्राप्त झालेला हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाबरोबरच जालना जिल्हा आणि बारी समाजासाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!