छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; अल्पवयीन विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकूने जीवघेणा हल्ला


छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; अल्पवयीन विद्यार्थ्याचा शिक्षकावर चाकूने जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये टीसी (Transfer Certificate) घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या वादातून एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीसी घेण्यासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्याचा शिक्षकासोबत काही कारणावरून वाद झाला. या वादानंतर संतापाच्या भरात विद्यार्थ्याने त्याच्याकडे असलेल्या चाकूने शिक्षकावर वार केले.
या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे.
प्राथमिक तपासात संबंधित विद्यार्थ्याने हा चाकू यापूर्वीच ऑनलाइन मागवला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास छावणी पोलीस करत आहेत.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!