बोगस FDA अधिकारी बनून हॉटेलवर धाड; बोरीवलीत दोघांवर गुन्हा दाखल
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिकारी असल्याचे भासवत बोरीवलीतील ‘आहार हॉटेल’वर धाड टाकून कारवाईची धमकी देणाऱ्या दोघांविरोधात बोरीवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय जाधव आणि स्वाती तुळसकर यांनी अन्न महामंडळाचे (FCI) बनावट ओळखपत्र दाखवत आपण FDA अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी हॉटेलमध्ये कारवाई करण्याची भीती दाखवून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने हॉटेल मालकाने तत्काळ बोरीवली पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांविरुद्ध फसवणूक व बनावट ओळखपत्राचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.
प्राथमिक तपासात आरोपींनी सध्या सुरू असलेल्या प्रशासनाच्या कडक कारवायांच्या वातावरणाचा गैरफायदा घेत हॉटेल चालकाला धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोरीवली पोलीस करत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






