शाहरुख खानच्या KKR ची ऐतिहासिक झेप; लॉस एंजिल्समध्ये उभारले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
लॉस एंजिल्स : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मालकीच्या ‘कोलकाता नाईट रायडर्स’ (KKR) फ्रेंचायझीने जागतिक क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. आयपीएल संघापासून जागतिक क्रीडा ब्रँडपर्यंतचा प्रवास करत KKR ने अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘नाईट रायडर्स क्रिकेट ग्राउंड’ उभारले आहे.
या मैदानावर मेजर लीग क्रिकेट (MLC) स्पर्धेतील पहिल्या सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या निमित्ताने KKR हा स्वतःचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणारा जगातील पहिला ग्लोबल क्रिकेट फ्रँचायझी ब्रँड ठरला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शाहरुख खान यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत हे आपले मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी काळात या मैदानावर अनेक मोठे आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत.
KKR च्या या उपक्रमामुळे भारतीय क्रिकेट फ्रँचायझींचा जागतिक स्तरावरील प्रभाव अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429







