ठाण्यात गॅलरीचा भाग कोसळला; एक जखमी, बचावकार्य सुरू


ठाण्यात गॅलरीचा भाग कोसळला; एक जखमी, बचावकार्य सुरू

ठाणे : किसन नगर ३ बस स्टॉपजवळ, ममता बाजारसमोरील तिवारी भवन परिसरातील एका इमारतीच्या गॅलरीचा काही भाग रविवारी अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच आरडीएमसी (RDMC) आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकांकडून मदत व बचावकार्य सुरू असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे.
या दुर्घटनेत एका व्यक्तीला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती आणि दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रशासनाकडून घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून अधिकृत माहितीनंतर पुढील तपशील जाहीर करण्यात येणार आहेत.

पत्रकार सिंथिया कोरिया


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!