छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे महानगरपालिका आणि राज्याभिषेक समारोह संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त “श्वासात राजं, ध्यासात राजं – स्वराज्य वीरांची अमर गाथा!” हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजल्यापासून गडकरी रंगायतन, ठाणे येथे विनामूल्य संपन्न होणार आहे. कार्यक्रमामध्ये स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाची संकल्पना व लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे असून निर्मिती पोर्णिमा मनोहर यांची आहे. यामध्ये दिग्पाल लांजेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर आणि अवधूत गांधी हे कलाकार सहभागी होणार आहेत.

स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे पोवाडा सादरीकरण,सॅक्सोफोन वादनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना,शिवजन्म ते शिवराज्याभिषेक या प्रवासाचे नृत्याविष्कार नृत्यधारासमूह,
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्र दर्शन प्रदर्शनाचे इत्यादीचे आयोजन या निमित्ताने करण्यात येणार आहे

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेशजी सप्रे आणि आर. जे. मानसीजी आमडेकर करणार आहेत.

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
९३२१९९२९०२ / ९००४८२४४९४

पत्रकार उमेश कुलकर्णी

9822548429

 


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!