पुण्यात डॉक्टर तरुणीची २४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; सुसाइड नोट सापडली


पुण्यात डॉक्टर तरुणीची २४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; सुसाइड नोट सापडली

पुणे : रावेत परिसरात २९ वर्षीय डॉक्टर तरुणीने २४ मजली बांधकामाधीन इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

डॉ. श्वेता रोकडे असे मृत डॉक्टर तरुणीचे नाव आहे. त्या रावेत येथील सेलेस्टीयल सिटी सोसायटीमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत राहत होत्या. शुक्रवारी सकाळी त्या घराशेजारील २४ मजली बांधकामाधीन इमारतीवर गेल्या आणि तेथून खाली उडी मारली. उंचावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्या राहत्या घरातून एक सुसाइड नोट मिळाली असून, त्यामध्ये मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

डॉ. श्वेता रोकडे या पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून रावेत पोलीस पुढील तपास करत आहेत

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!