आषाढी वारी पूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी:-
जि.जळगाव.ता.मुक्ताईनगर :दी. 5 जुलै :-मुक्ताईनगर येथून पंढरपूर कडे जाणाऱ्या संतूमुक्ताई पालखी सोहळ्याला आता काहीच दिवस उरले असताना पालखी मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकरी आणि भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. मात्र पापनस ते माढा या मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः बेंदवडा परिसरातील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
वारकरी संप्रदायासाठी आषाढी वारीचे विशेष महत्त्व असून हजारो भाविक पायी प्रवास करतात. अशा परिस्थितीत खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत, साचलेल्या पाण्याची व्यवस्था करावी आणि अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशी मागणी भाविक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.








