पावसाने केले नेटकऱ्यांना हवालदिल; मोबाईल नेटवर्क गायब


पावसाने केले नेटकऱ्यांना हवालदिल; मोबाईल नेटवर्क गायब

भोसरी | प्रतिनिधी
भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी हजारो नागरिकांना कॉलिंग, इंटरनेट तसेच ऑनलाइन व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये मोबाईलला सिग्नल मिळत नसल्याने फोन लागत नाहीत, तर इंटरनेटचा वेग अत्यंत मंदावल्याने कार्यालयीन कामकाज, ऑनलाइन शिक्षण, बँकिंग व्यवहार आणि डिजिटल पेमेंटवर परिणाम झाला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरही नेटवर्कच्या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सततच्या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने मोबाईल चार्ज करण्याचीही समस्या निर्माण झाली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संपर्क साधणे कठीण झाले आहे.
मोबाईल सेवा पुरवठादारांनी पावसामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले असून सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे समजते. दरम्यान, नागरिकांनी संयम बाळगावा आणि आवश्यक असल्यास पर्यायी संपर्क माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी विजय अडसूळ


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!