शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही : मुख्यमंत्री फडणवीस


शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई — शरद पवार यांच्या पक्षाचा एनडीएसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि याबाबतच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, ही भेट संसदीय समितीच्या बैठकीदरम्यान सेंट्रल हॉलमध्ये अनौपचारिक स्वरूपाची होती; त्या वेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. अशा भेटींना राजकीय अर्थ लावण्याचे कारण नसून, सध्या एनडीएसोबत कोणताही नवीन पक्ष घेण्याचा विचार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रतिनिधी — उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!