पुणे रेल्वे स्थानिक गुन्हे शाखेचे अमरदीप साळुंखे यांना एएसआय (ASI) पदी पदोन्नती; २८ वर्षांची उत्कृष्ट सेवा, २७५ पुरस्कारांचा मान


पुणे रेल्वे स्थानिक गुन्हे शाखेचे अमरदीप साळुंखे यांना एएसआय (ASI) पदी पदोन्नती; २८ वर्षांची उत्कृष्ट सेवा, २७५ पुरस्कारांचा मान

​पुणे:पुणे रेल्वे पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमरदीप सिद्धार्थ साळुंखे यांना साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती मिळाली आहे. आपल्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ आणि कर्तव्यदक्ष सेवाकाळात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना हा बहुमान देण्यात आला आहे.
​अमरदीप साळुंखे हे १ जानेवारी १९९८ रोजी पोलीस दलात रुजू झाले होते. गेल्या २८ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध विभागांत अत्यंत चोखपणे जबाबदारी पार पाडली आहे. रेल्वे पोलीस दलातील एक उत्कृष्ट हॉकीपटू (Hockey Player) म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. गुन्हे शोध, रेल्वे सुरक्षा, क्रीडा क्षेत्र आणि तपासातील त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना आतापर्यंत तब्बल २७५ बक्षिसे व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
​त्यांच्या या उत्कृष्ट आणि निष्कलंक सेवेची दखल घेऊन त्यांना २०२२ मध्ये सन्माननीय ‘पोलीस महासंचालक पदक’ (DG Insignia) देऊन गौरविण्यात आले आहे.
​सध्या पुणे रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साळुंखे यांना मिळालेल्या या एएसआय (ASI) पदोन्नतीबद्दल रेल्वे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!