सांगली येथील संघटित गुन्हेगार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई :-
सांगली: दी. 8 जुलै :-शहरातील अल्पवयीन वेदांत मारुती बंडगर खून प्रकरणातील ‘एन. जी. ग्रुप’ संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी बालकासह ९ आरोपींवर मोक्काच्या कलमांचा समावेश करण्यास मंजुरी दिली आहे.
संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू असताना, या टोळीने २०१७ ते २०२६ या कालावधीत सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातही गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
टोळी प्रमुख निलेश गडदे याच्यासह ९ आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अपहरण यासह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देत विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांनी संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही कारवाई केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात पोलिसांचा मोठा दणका मानला जात आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.







