​खडकी रेल्वे स्थानक येथे सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेतर्फे वारकऱ्यांना फराळ व पाणी वाटप


​खडकी रेल्वे स्थानक येथे सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेतर्फे वारकऱ्यांना फराळ व पाणी वाटप

​पुणे :जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे खडकी रेल्वे स्टेशन येथे आगमन झाले. या निमित्ताने सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था, लोहमार्ग पोलीस, पुणे यांच्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरात संस्थेचा स्टेज उभा करून वारकऱ्यांना फराळ आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
​जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सुमारे दुपारी २:४५ वाजण्याच्या दरम्यान खडकी रेल्वे स्टेशन येथे आली. यावेळी सेवानिवृत्त पोलीस संस्थेच्या वतीने तुकाराम महाराजांच्या पादुकांवर हार-फुले वाहून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान झाली.
​या कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्था लोहमार्ग, पुणे चे अध्यक्ष नानाभाऊ मापारी , उपाध्यक्ष भानुदास पवळे, कार्याध्यक्ष बंडू जाधव आणि पदाधिकारी पोपटराव पवार,अशोक मोहिते, प्रकाश गायकवाड, सौ. प्रभा बनसोडे, विष्णू कर्डिले, सर्जेराव शिंदे, रमेश यादवाडे, गौतम खरात, धनंजय खटाटे , विटकर, माळवदकर, काळोखे व इतर सभासद मोठ्या संख्येने हजर होते. पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे अध्यक्ष सुबराव लाड यांनी देखील या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली
टाळ-मृदंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. सेवानिवृत्त पोलीस बांधवांनी केलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे वारकरी व उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!