चार महिन्यांपासून ग्राम रोजगार सेवकाचे मानधन थकीत; चौकशी करून तातडीने मानधन अदा करण्याची मागणी


चार महिन्यांपासून ग्राम रोजगार सेवकाचे मानधन थकीत; चौकशी करून तातडीने मानधन अदा करण्याची मागणी

पारध, प्रतिनिधी : पारध शाहूराजे (ता. भोकरदन, जि. जालना) येथील ग्राम रोजगार सेवक संतोष छगनराव पाखरे यांचे गेल्या चार महिन्यांपासूनचे ₹33,410 मानधन प्रलंबित असल्याचा आरोप करत, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून हेतुपुरस्सर मानधन रोखून धरणाऱ्या दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी तसेच थकीत मानधन तातडीने अदा करावे, अशी मागणी वरिष्ठ प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात संतोष पाखरे यांनी जिल्हाधिकारी, जालना, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना, गटविकास अधिकारी, पंचायत समिती भोकरदन तसेच ग्रामपंचायत पारध शाहूराजे यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे.

तक्रार अर्जानुसार, नियमानुसार देय असलेले मानधन गेल्या चार महिन्यांपासून अदा करण्यात आलेले नाही. सुमारे ₹33,410 इतकी रक्कम ग्रामपंचायतीकडे प्रलंबित असून, ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांकडे वारंवार पाठपुरावा करूनही मानधनाचा प्रश्न निकाली न निघाल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारीत मानधन वितरण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, संतोष पाखरे हे ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे भोकरदन तालुका अध्यक्ष आहेत. तालुकाध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्याचेच मानधन चार महिन्यांपासून प्रलंबित राहिल्याने ग्रामीण भागातील ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी अपेक्षा ग्राम रोजगार सेवकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या तक्रारीमुळे ग्रामीण भागातील ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची कितपत गांभीर्याने दखल घेतली जाते आणि दोषींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी महेंद्र बेराड


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!