बारामतीमध्ये पोलीस भरतीचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; पीएसआयसह दोघांवर गुन्हा दाखल


बारामतीमध्ये पोलीस भरतीचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; पीएसआयसह दोघांवर गुन्हा दाखल

​बारामती: पोलीस भरती आणि बँड्समन परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला पोलीस भरती प्रक्रियेत आणि परीक्षेत मदत करण्याचे आमिष दाखवून आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अत्यंत गंभीर प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडून योग्य ती दाद न मिळाल्याने पीडितेने अखेर न्यायालयाचे दार ठोठावले होते.
​न्यायालयाच्या कायदेशीर आदेशानंतर बारामती ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास पोलीस प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन करण्याचा इशारा पीडित तरुणीने दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!