सांगली शहराला सतर्क तेचा इशारा, कृष्णा नदीची पातळी तीस फुटावर :-


सांगली शहराला सतर्क तेचा इशारा, कृष्णा नदीची पातळी तीस फुटावर :-

सांगली :दी. 9 जुलै :-शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिमझिम सुरू राहून काही काळ पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, कृष्णा नदीची पाणी पातळी ३० फुटांवर पोहोचली असून पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पाण्याची पातळी वाढल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!