लोणी देवकरचे सुपुत्र विजय रघुनाथ हरिहर यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती


लोणी देवकरचे सुपुत्र विजय रघुनाथ हरिहर यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

​लोणी देवकर: गावचे सुपुत्र विजय रघुनाथ हरिहर यांना महाराष्ट्र पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीमुळे लोणी देवकर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
​विजय रघुनाथ हरिहर हे एक उत्कृष्ट हॉकीपटू असून त्यांनी पोलीस दलात तब्बल २९ वर्षे अविरत आणि उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ सेवाकाळातील उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना अधिकृत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
​हरिहर हे सध्या सुरक्षा शाखेमध्ये कार्यरत असून त्यांनी आपल्या सेवाकाळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना आतापर्यंत तब्बल ७५ वैयक्तिक बक्षिसे मिळाली आहेत. अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या हरिहर यांच्या या मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांचे सर्व मित्रमंडळी कौतुक करत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
​त्यांच्या या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल समस्त ग्रामस्थ लोणी देवकर यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!